लासलगाव – लासलगाव येथे जनता कर्फ्यू असताना आज काही दुकाने उघडी होती. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ही दुकाने सील केली. या दुकानदारांकडून ३३०० रुपये दंड वसूल केला. तसेच पूर्ण गावामध्ये हायड्रोक्लोराइड फवारणी करून संपूर्ण गाव सॅनेटाइझ करण्यात आले. तसेच ज्या परीसरात पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तो परिसर कंटेन्मेंटझोन करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली.










