लासलगाव – येथील अमृत नगर येथील रहिवाशी गौरव बाबाजी पगार यांनी गणित विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट परीक्षा घेण्यात आली होती. गौरव पगार हे १६४ गुण मिळवून ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना पुणे विद्यापीठाचे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक असलेले वडील व मुख्याध्यापिका असलेली आई यांनी तसेच प्रा. सतिश जाधव व मित्र परिवाराने अभिनंदन केले.