लासलगाव.- .निफाड तालुक्यात कोरोना रुग्णांचा वेग वाढला आहे. कोरोना संसर्गाने ग्रामीण भागालाही विळखा घातलेला आहे. लासलगाव व परिसरातील रुग्णसंख्या वाढत आहे. त्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी दीप कन्ट्रक्शनचे चेअरमन डी.के जगताप व सुवर्णा जगताप यांच्यातर्फे पाच ऑक्सिजन मशिन लोकांच्या सेवेसाठी गणेश चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आले.
लासलगावातील सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाच्या विळख्याने सर्वत्र वेढले आहोत. लासलगावात डॉक्टर व समाजातील इतर घटक आपल्या पध्दतीने सर्वतोपरी मदत करताना दिसतात.मात्र ऑक्सिजन सिलेंडरचा सर्वत्र तुटवडा आहे. गावातील त्याची गरज बघता कोरोना पीडित गरजूंना गावातील बॅंका, इतर संस्था, मेडिकल , डॉक्टर आसोशियन, सर्व पतसंस्था व इतर सेवाभावी संस्थांनी जर उपलब्ध करून दिली तर गरीब,गरजू लोकांचा नक्कीच फायदा होईल.
लासलगाव येथील श्री गणेश मंदिर ट्रस्ट येथे गरजू रुग्णांना ऑक्सीजन मशीन फिट करताना श्री गणेश मंदिर अध्यक्ष डी .के . जगताप ,सौ सुवर्णा ताई जगताप, उपाध्यक्ष निलेश उर्फ बापुसाहेब लचके कैलास जैन ,सुनिल सानप ,बगडाने मिस्तरी दिसत आहेत.