लासलगांव – लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पाच हजार मास्क वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुख्य बाजार लासलगाव, उपबाजार विंचूर, निफाड येथील सर्व शेतकऱ्यांना हे वाटप करण्यात आले. या प्रसंगी चेअरमन सुवर्णा जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे यांनी कोरोनाचा अजूनही धोका वाढत आहे, त्यामुळे बाजार समितीमध्ये येणारा प्रत्येक शेतकरी, प्रत्येक घटक यांना सरंक्षण म्हणून हे मास्क चे वाटप करण्यात आल्याचे सांगितले.