खाकलासलगाव – येथील निर्यातदार कांदा व्यापारी कांतीलाल सुराणा यांच्या लासलगाव-विंचूर रोड वर कांद्याच्या गोडाऊनमध्ये आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे बारदान आगीत जळून खाक झाले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही आग लागली. ही आग इतकी भीषण होती की धुराचे मोठ मोठे लोळ उठत होते. ही आग लागली तेव्हा मोठ्या संख्येने मजूर वर्ग त्या ठिकाणी काम करत होते. ही आग लागल्याचे समजताच मजूर वर्ग तातडीने गोदामाच्या बाहेर पडले. त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. आग कशामुळे लागली हे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!