सकाळपासून मतदान केंद्रावर चांगला उत्साह दिसत होता.लासलगाव ग्रामपालिकेच्या १३९४५ मतदारांपैकी ९२०९ मतदारांनी आपला हक्क बजवला आहे.या वेळी मतदान प्रक्रिया शांततेत आणि चुरशीने पार पडली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक उमेदवार व कार्यकर्ते आपले मताधिक्य वाढावे यासाठी धडपड करताना दिसत होते. मतदानासाठी वारंवार मतदारांशी संपर्क साधत होते. अपंग व वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती. कोरोना पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांना मास्कची सक्ती केली तर आलेल्या प्रत्येक मतदारांचे तापमान चेक करत सोडले जात होते. येथील मतदान केंद्रावर लासलगाव पोलिस ठाण्याचे सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.