लासलगाव – येवला एसटी आगारात वाहक असलेल्या महिलेने तिच्या तरुण मुलासह रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
एसटी वाहक असलेल्या अंजली भुसनळे यांनी त्यांचा तरुण मुलगा उत्कर्ष भुसनळे याच्यासह लासलगाव येथे रेल्वेखाली मध्यरात्री आत्महत्य केल्याचे उघड झाले आहे. लासलगाव रेल्वे स्थानकाजवळच दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. अंजली या येवला बस आगारात वाहक म्हणून नोकरीला होत्या. त्यांचा मुलगा उत्कर्ष याचे लॉकडाऊन काळातच लग्न झाले आहे. त्याची पत्नी सध्या माहेरी गेलेली आहे. भुसनळे कुटुंबिय येवल्यात राहतात. त्यांनी २४ किलोमीटर लांब असलेल्या लासलगावला जाऊन रात्री २ वाजता रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समजते आहे. असे काय घडले की मायलेकाने टोकाचे पाऊल उचलले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे
दोन्ही मृतांची छायाचित्रे अशी