लासलगांव – पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत अंधेरी लोखंडवाला येथे सुरू झालेल्या स्वाद महाराष्ट्राचा या रेस्टॉरंटला येत्या १० जानेवारी २०२१ ला यशस्वी एक हजार दिवस पूर्ण झाले व त्याच दिवसाच्या पूर्वसंध्येला राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते रेस्टॉरंटच्या संचालिका सौ. शीतल सुहास झांबरे यांना वैयक्तिक अन्नदानसेवेबद्दल केशवसृष्टी पुरस्कार – २०२० प्रदान करण्यात आला. झांबरे कुटुंबिय मुळचे लासलगावचे असून ते आता मुंबई येथे वास्तव्यास आहे. कोरोना काळात २२५ दिवसांपासून स्वाद महाराष्ट्राचा रेस्टॉरंट द्वारे ३१ हजार ५० लोकांना मोफत अन्नदान सेवा देण्यात आली. अजूनही गरजू लोकांसाठी ही अन्नदान सेवा चालू आहे.