लासलगांव – लासलगांव सायक्लीस्ट क्लबने लासलगांव ते सप्तशृंगगड व पुन्हा लासलगांव अशी १५० किमी सायकल रॅली काढुन Immunity is your vaccine ( रोगप्रतिकारशक्ती हीच तुमची लस) असा समाजप्रबोधन पर संदेश दिला.या रॅली काढण्याच्या उद्देशाबाबत क्लबच्या सदस्यांनी सांगितले की, गेल्या नऊ महिन्यापासुन सर्वच जग हे कोरोनाशी लढत आहे. परंतु, कुठलीही ठोस औषध उपचारपध्दती अजुनही उपबध्द होऊ शकलेली नाही. येणारी कोरोनानालस ही कीती प्रमाणात उपयोगी ठरेल यात शाशंकता आहे. सध्या करोनाचा रिकव्हरी रेट हा ९२ टक्के झाला आहे व त्याचे कारण म्हणजे भारतीय लोकांमध्ये तयार होत असलेली रोगप्रतिकारशक्ती ( Immunity). त्यासाठी लासलगांव सायक्लीस्ट असोसिएशनने समाजप्रबोधन पर लासलगांव – सप्तशृंगगड – लासलगांव अशी सायकल रॅली काढुन Immunity is your vaccine असा संदेश दिला. यात सायकल गुपचे अध्यक्ष अनिलशेठ ब्रम्हेचा, संजय पाटील, डॉ किरण निकम, डॉ अनिल ठाकरे, तुषार लोणारी, महेश वर्मा, व्यंकटेश वाबळे, अमोल गंगेले, विजु कुंदे, संजय कदम, कन्हैया पटेल यांनी सहभाग घेतला व या रॅलीसाठी रुपेश ट्रेडिंग कंपनीचे सहकार्य लाभले…