लासलगांव – येथील विविध सामाजिक धार्मिक राजकीय पक्षाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भारतीय बौद्ध महासभेचे सचिव शामराव सांळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे आरपीआयचे जेष्ट नेते कैलास केदारे यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. अमोल संसारे यांनी संविधान उद्देशिका वाचन केले कार्यक्रमाला आरपीआयचे जेष्ट नेते जीवन अहिरे, शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ, डॉ अमोल शेजवळ, वंचित बहुजन आघाडीचे सोनू शेजवळ, सागर अहिरे, विकास खंडीझोड, ऊमा शेजवळ, सनी पाठक, हसन शेख, प्रकाश पाटील विलास खैरनार, अविनाश पगारे, करण विस्ते, जय भीम सोनवणे, सुरज झाल्टे, बनकर सर, नानासाहेब बनसोडे नानासाहेब सूर्यवंशी, नितीन पाठारे, हे उपस्थितीत होते. या प्रसंगी मुंबई येथे झालेल्या २६/११ हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले.