लासलगांव – कांद्याचे लिलाव खुल्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या बाजार समित्यांमध्ये वाहनांची पार्किंग करणे लिलावाच्या वेळेस खाली पडलेला कांदा भरणे आणि कांद्याचे वजन करणे ही जबाबदारी यापुढे बाजार समितीची व खरेदीदार व्यापाऱ्यांची असेल त्यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटना राज्यातील सर्व बाजार समित्यांना १० सप्टेंबर रोजी पत्र देणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. या पत्रात गोणी पद्धतीने लिलाव केल्या जाणाऱ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या गोणींचे पैसे हे बाजार समितीने किंवा व्यापाऱ्यांनी द्यावयाचे आहे शेतकरी गोणींचे पैसे यापुढे देणार नाही.
बाजार समित्यांनी वरील निर्णय तात्काळ लागू करावा अशी मागणी त्यांनी केली.