लासलगाव – मनमाडजवळील रायपुर येथील दत्तात्रय वाल्मीक सोनवणे किराणा सामानाची खरेदी करण्यासाठी त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीतील कापडी पिशवीतील साडेतीन लाख रुपये अज्ञात चौघांनी लुटुन नेल्याची घटना लासलगाव येथे दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,मनमाडजवळील रायपुर येथील दत्तात्रय वाल्मीक सोनवणे किराणा सामानाची खरेदी करण्यासाठी त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडी नं एम एच ४२ व्ही .५९२१ कार मध्ये साडेतीन लाख रुपये घेऊन आले होते. लासलगाव येथील अंबिका चिवडा या बस सँण्डजवळ आंबीका भेळ भत्ताचे दुकानसमोर पावणेतीन वाजता गाडीत सफेद कापडी पिशवीत ५०० रु दराच्या नोटांचे दोन लाख रुपये व १०० रुपये दराच्या नोटा असलेले दीड लाख रुपये एकुण साडेतीन लाख रूपये असे पिशवीत ठेवलेले असतांना या ठिकाणी एका मोटार सायकलवर आलेल्या दोन जणांपैकी एकाने गाडीचा दरवाजा उघडुन निघुन गेले व लगेचच त्याचे मागुन आलेल्या मोटार सायकल वरील दोघांपैकी एकाने गाडीत ठेवलेली साडेतीन लाख रूपये असलेली कापडी पिशवी घेऊन फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरून पलायन केले.
याबाबत दत्तात्रय वाल्मिक कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लासलगांव पोलीस स्थानकात भादवि कलम ३७९ व ३४ , ३४ प्रमाणे अज्ञात चार जणविरूध्द गुन्हा दाखल केला आहे .अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कोठाळे करीत आहेत.