लासलगांव – भारतीय जनता पार्टीचे मा. लासलगाव शहर अध्यक्ष राजाभाऊ चाफेकर यांची भुसावळ विभाग रेल्वे सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चाफेकर यांचे खा.डॅा. भारती पवार, जिल्हा परिषद सदस्य डी.के.नाना जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सौ.सुवर्णा जगताप, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा, जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर, आमदार राहुल आहेर यांनी या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आहे.