लासलगांव – कोवीडच्या पार्श्वभुमीवर श्री.गणपती विसर्जनसाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून खालील ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी आपले श्री.गणेशाचे विसर्जन, मुर्ती दान करण्यासाठी खालील ठिकाणीच सोशल डिस्टसिंगचा वापर करावा. श्री.गणेशाचे विसर्जन करतांना मास्कचा वापर करावा. तसेच श्रीगणेशाचे विसर्जनाचे वेळी नमुद ठिकाणी गर्दी करु नये. ज्यांचे मुर्ती विसर्जन, दान केल्यानंतर तात्काळ घरी जावे. श्री.गणेशाची शेवटची आरती, पुजा घरुनच करुन यावी. ज्यांचे घरात पॉझिटीव्ह रुग्ण असतील त्यांनी श्री.गणेशाचे विसर्जन घरीच करावे असे आवाहन ग्रापंचायतीने केले आहे.
येेथे आहे विसर्जनाची सुविधा
वार्ड क्र. १ – शिवकमल मंगल कार्यालय
वार्ड क्र. २ – बोराडे हॉस्पटील जवळील ओपन स्पेस
वार्ड क्र. ३ – सरस्वती विद्यामंदिर प्रांगण
वार्ड क्र. ४ – ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगण
वार्ड क्र. ५ – शिवाजी चौक
वार्ड क्र. ६ – किल्याच्या पाठीमागे ( श्री.अनिल सोनवणे यांचे घरासमोरील ओपनस्पेस )