लासलगांव – लासलगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तीन दिवस बंद राहणार आहे. शुक्रवार ते रविवारी या तीन दिवसात बाजार समितीत लिलाव होणार नाही. त्यामुळे शेतक-यांची गैरसोय होणार आहे. सभापती सुवर्णा जगताप, उपसभापती प्रिती बोरगुडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांनी शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलणार यांच्यासाठी जाहीर सुचना प्रसिध्द केली आहे.
शुक्रवार २१ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ लि.पुणे यांचेकडील पत्रानुसार महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांचा लाक्षणिक संप आहे. त्यामुळे कांदा, धान्य भुसार, डाळिंब, भाजीपाला व टोमॅटो या शेतीमालाचे लिलाव बंद रहातील. तर शनिवारी श्री गणेश चतुर्थी असल्याने कांदा व धान्य भुसार शेतीमालाचे लिलाव बंद रहातील. रविवार रोजी साप्ताहिक आहे.