लासलगांव – लासलगांव शहर विकास समितीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना लासलगांव येथील नागरी सुविधांबाबत
निवेदन दिले. या निवेदनात लासलगांवच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या निवेदनातील प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन भुजबळ यांनी समितीच्या सदस्स्यांना दिले. या निवेदनात पुढील समस्या मांडण्यात आल्या..
लासलगांव डंपींग राऊंड ( कचरा डेपो)
लासलगांव शहराला शीवनदिच्या किनारी कचरा डेपो आहे. तेथे गेल्या २० वर्षापासुन कचरा टाकला जातो.
कचरा डेपो हा वेळो-वेळी पेटवला जातो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व धुरामुळे नागरीकांच्या
आरोग्य धोक्यात येते. नागरीकांचा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण लवकरात
लवकर शासनाकडुन निधी उपलब्ध करून कचर्यापासुन खत निर्मिती प्रकल्प सुरू करून कच-याचे संपूर्णपणे
निर्मुलन करावे.
व्हॅक्युम मशिन – ग्रामपंचायतचेे व्हॅक्युम मशिन (मैला उपसण्याचे मशिन) हे गेल्या महिन्यापासुन नादुरूस्त असल्यामुळे
नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर व्हॅक्युम मशिन
दुरूस्त करून नागरीकांना सेवा पुरवावी तसेच पर्यायी मशिनची व्यवस्था करावी जेणे करुन अडचण निर्माणच
होणार नाही.
अॅम्ब्युलन्स सेवा – ही सेवा चालु करणे बाबत.आपल्या नावाने सुरू असेलेली अॅम्ब्युलन्स सेवा गाडी नादुरूस्त असल्यामुळे ब-याच महिन्यांपासुन बंद आहे. त्यामुळे रूणांना मोठ्या प्रमाणावर कोरोना काळात देखील गैरसोयीचा सामना करावा लागत आहेत. तरी लवकरात लवकर अॅम्बुलन्स सेवा सुरू करावी.
घरकुल योजना : लासलगाव शहरातील सुमारे ५०० बेघर कुटुंब धारकांचा प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ड यादीत
समावेश असून अशा बेघर कुटुंब धारकांना ग्रामपंचायत मालकीच्या जागेमध्ये महाराष्ट्रात एक नविन आदर्श निर्माण होईल अशा नाविण्यापुर्ण वसाहतीची निर्मिती करून सर्व बेघर धारकांना आपल्या माध्यमातुन लवकरात लवकर घरकुल मिळण्याची व्यवस्था करावी.
ओपनस्पेस स्वच्छतेबाबत : ओपनस्पेस, उद्यानांची यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. ओपनस्पेस आणि उद्यानात कच-याचे ढीग आणि गवत वाढले आहे. त्यामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तरी ओपन स्पेस स्वच्छ करून मुरूम टाकुन नागरीकांसाठी खुले करावे
या निवेदनात हे प्रश्न सुटावे अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रकाश पाटील, विकास कोल्हे, प्रविण कदम, देवेद्र भावसार, महेश मोरे, धर्मेश जाधव, बबन शिंदे,संदिप उगले,अनिल आब्बड, मयुर झांबरे, राजेंद्र कराड, अफजल शेख, राजाभाऊ जाधव, महेश बकरे, महेश हांडगे, रामेश्वर कहांडळ, मनोज होळकर, ललित पानगव्हाणे, संदिप गांगुर्डे, शरद साबळे, हर्षद नागरे,
सुरेश कुमावत यांच्या सह्या आहेत.