लासलगांव – लासलगांव ग्रामपंचायत निवडणुकीत जयदत्त होळकर -नानासाहेब पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलने १७ पैकी १० जिंकत वर्चस्व मिळवले. तर माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या परिवर्तन पॅनलला ७ जागा मिळाल्या. अत्यंत चुरळीश्या झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत कोणाची सरशी होते यावर पैंजा लागल्या होत्या. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर होळकर – पाटील गटाचे वर्चस्व या निवडणुकीत असल्याचे स्पष्ट झाले.
कित्येक दशकानंतर लासलगाव येथे होळकर पाटील गट एकत्रीत मतदारांना सामोरे गेले. त्यानंतर या निवडणुकीमध्ये सत्ताधारी ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश मिळवत परिवर्तन पॅनलला घरचा रस्ता दाखविला.या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जयदत्त होळकर,नानासाहेब पाटील यांचे ग्रामविकास पॅनल तर कल्याणराव पाटील, डी. के. जगताप, प्रकाश दायमा यांचे परिवर्तन पॅनल आमने सामने होते. येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये संतोष पलोड व संदीप उगले यांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्यात आली यात संतोष पलोड यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी करण्यात आली.
वार्ड क्रमांक १ – चंद्रशेखर होळकर यांना ५६०, अश्विनी बर्डे ५२६, सौ.अमिता अक्षय ब्रम्हेचा ५३०
वार्ड नंबर २ – रोहित पाटील ११६७,अमोल थोरे १०५२, कुमारी सायली पाटील १०४८
वार्ड नंबर ३ – नानासाहेब पाटील यांना ११६१, सौ.सुवर्णा जगताप १२६२
वार्ड नंबर ४ –अफजल शेख ८२४,पुष्पा आहिरे ६९९, सौ.रेवती होळकर ७४५
वार्ड नंबर ५ – संतोष पलोड ४९९, सौ.संगीता पाटील ६८८, सौ.योगिता पाटील ६४३
वार्ड नंबर ६ – जयदत्त होळकर ८९६, रामनाथ शेजवळ ८०७, सौ.ज्योती निकम ७३९
हे उमेदवार निवडून आले आहे.
चिठ्ठी सोडतीत संतोष पलोड विजयी
येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये संतोष पलोड आणि संदीप उगले यांना प्रत्येकी ३९९ मते मिळाल्याने सोडत पद्धतीमध्ये संतोष पलोड यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी घोरपडे यांनी संतोष पलोड यांना विजयी घोषित केले.