लासलगांव – लासलगांव शहर विकास समितीने लासलगांव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांना साकडे घातले. यावेळी समितीने पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, लासलगांव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण लक्ष घालावे. लासलगांव शहर हे आशिया खंडातील मोठी कांद्याची पेठ आहे. त्यामुळे ही निवडणुक आपल्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध व्हावी अशी शहरातील सर्व सामान्य नागरीकांची इच्छा आहे. या विषयात आपण विषेश लक्ष घालुन आपल्या माध्यमातून निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले. या निवेदनात ग्रामपंचायतीत नवीन व होतकरू चेहर्यांना संधी द्यावी असेही म्हटले आहे.
या भेटी प्रसंगी पालकमंत्री भुजबळ यांनी लासलगाव शहर विकास समितीच्या सदस्यांना सांगितले की, स्थानिक नेत्यांना संपर्क साधून लासलगांव ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी सर्वोतरी प्रयत्न करु. यावेळी शहर विकास समितीचे प्रकाश पाटील, बबनराव शिंदे, अनवर शेख, धर्मेश जाधव, मन्सुरभाई शेख, प्रविण कदम, महेंद्र हांडगे, विकास कोल्हे,चंद्रकांत नेटारे, संतोष पवार, संदिप उगले, भैय्या नाईक, बाळासाहेब दराडे, सुरज खैरे, राजेंद्र मुनोद, पप्पुशेठ पंजाबी, गणेश कुलकर्णी, राजेंद्र कराड, सलीम सय्यद, प्रमोद पाटील, अनिल आबड,दिनेश जोशी, सुरेश कुमावत, गणेश इंगळे, महेश मोरे,गुलाब रंगरेज यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.