लासलगांव – गोदावरी एक्सप्रेस, मनमाड-इगतपुरी शटल चालु करण्यात यावी यासाठी लासलगांव शहर विकास समिती तर्फे खासदार डॉ. भारती पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, चाकरमानी हे हातवर काम करणारे असून त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह त्यांच्याच पगारावर होत असतो. पण रोज ये-जा करण्यासाठी साधन नसल्यामुळे बहुतेकांच्या नोक-या गेल्या आहे. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे ते हालाखीचे जीवन जगत आहे. गोदावरी एक्सप्रेस ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत धावणारी गाडी असून ती सुरू झाल्याने प्रवाशांना फायदा होईल. तसेच गोदावरी एक्सप्रेस महिला, मुली व इतर सर्वच प्रवाशांना वेळेत घरी येण्यासाठी सोयीची आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या गाडया बंद आहे. तरी या गाडया तातडीने सुरू करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
निवेदन देतांना प्रकाश पाटील, प्रविण कदम, विकास कोल्हे, बबन शिंदे, शितल साबद्रा,धर्मेश जाधव, सुरेश कुमावत, कैलास केदारे,मंदार खानापुरकर, राजेंद्र जाधव, प्रताप वाघ, राजेंद्र कराड, संदिप उगले, महेश हांगडे, राम बोराडे, संतोष पवार, गुलाम रंगरेज, महेश मोरे, राजेंद्र टर्ले,विनोद राठी,रुपेश भांगडीया,प्रतिक वाघचौरे, विलास लुटे, जितेंद्र परदेशी, महेश साळुंके, राजेंद्र वाकचौरे व समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.