लासलगांव – कोविड योद्धे म्हणून लासलगाव ग्रामीण रुग्णालयचे डॉक्टर, परिचारिका आणि लासलगाव परिसरातील सर्व पत्रकार यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजर समितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाजार समितीच्या सभापती सुवर्णाताई जगताप, जिल्हा परिषद सदस्य डी. के. नाना जगताप, भाजप कोषाध्यक्ष प्रकाश दायमा, कैलासशेठ सोनवणे, बाजार समितीचे संचालक शिवनाथभाऊ जाधव, रमेशभाऊ पालवे, अनिल सोनवणे,वनसगावचे सरपंच उन्मेष डुंबरे,पं.स. उपसभापती संजय शेवाळे, संपत नांगरे, उद्योगपती संतोष शेठ पलोड, भरतभाऊ कानडे, राजाभाऊ चाफेकर, लासलगाव भाजप शहराध्यक्ष योगेश पाटील,मंडल अध्यक्ष रविभाऊ होळकर,निलेशजी लचके, सचिव नरेंद्र वाढवणे,व्यापारी मनोज जैन,मंडल महिला अध्यक्ष स्मिताताई कुलकर्णी, उपाध्यक्ष ज्योतीताई शिंदे, रूपाताई केदार, रंजनाताई शिंदे, सिंधुताई पाल्हाळ हे उपस्थित होते. यावेळी तहसिलदार यांचा निरोप समारंभही संपन्न झाला.