लासलगांव – लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्यांना अनेक वर्षापासून मुलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे या सर्व समस्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून या सर्व समस्यांकडे लक्ष देऊन सोडवाव्यात असे निवेदन लासलगांव शहर विकास समितीने कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहे. हे प्रश्न सुटले नाही तर शेतकर्यांसोबत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. कृऊबाचे सचिव नरेंद्र वाढवणे यांना हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहर विकास समितीचे बाळासाहेब जगताप, प्रकाश पाटील, उत्तम वाघ, प्रमोद पाटील, राजेंद्र कराड,
बबन शिंदे, संदिप उगले, सुरेश कुमावत, भैय्या भंडारी, महेंद्र हांडगे, धर्मेश जाधव, महेश मोरे, बापु कुशारे, जितेंद्र फापाळे, रोहित जगताप उपस्थित होते.

या निवेदनात विविध समस्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
– शेतकरी बांधव ज्या दिवशी आपला शेतमाल विकतात त्याच दिवशी तात्काळे कॅश ( रोख स्वरूपात)/डिजिटल बँक पेमेंट मिळावे.
– बाजार समितीत शेतकर्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था अद्यापही नाही. उत्कृष्ट दर्जाची निवास व भोजन व्यवस्था व्हावी.
– जुन्या मार्केट चारही प्रवेश व्दारा लगत स्वच्छता गृहाची सोय नसल्यामुळे मार्केटसंबंधी सर्व घटकांना नाईलाजास्तव प्रात: विधी उघड्यावर करावे लागते. त्यामुळे परिसरात दुर्गधी चे सामराज्य पसरले आहे. त्यामुळे प्रत्येक गेट जवळ लवकरात लवकर स्वच्छता गृह बांधावे.
– सर्व शेतकरी बांधवांच्या ट्रॅक्टर व पिकअपला रेडियम बिल्ले लावण्यात यावे. त्यामुळे रात्रीच्या होणार्या अपघातांना आळा बसेल. नवीन मार्केट मध्ये मागील बाजुस मोठ्या प्रमाणात कचरा साठवलेला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधींचे सामराज्य पसरले आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी तसेच मार्केट घटकातील सबंधित नागरीकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कचराडेपो तात्काळ हटवावा.
– नवीन मार्केट मध्ये एक हजार टॅक्ट्ररसाठी लिलाव शेड बांधण्यात यावे जेणे करून पावसाळ्यात शेतकर्यांचे माल ओला होणार नाही व मालाचे नुकसान होणार नाही.
– रात्रीच्या वेळेस जे ट्रॅक्टर लिलावासाठी येतात त्यातील शेतमालाच्या, डिझेलच्या व बॅटर्या यांच्या चोर्या होतात. त्यासाठी रात्रपाळीसाठी स्पेशल गार्ड ठेवावे.
– नवीन व जुन्या बाजार समितीत आवारात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन लोकांचा अड्डा झाला आहे. त्याच्या तात्काळ बंदोबस्त करावा.
– बाजार समितीत होणारा भाजीपाला लिलाव आडत्याच्या मनमानी कारभारा प्रमाणे न होता कांदा किंवा धान्य लिलावाप्रमाणे कामकाज व्हावा.