लासलगांव – सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवला तालुक्यातील सोमठाणदेश येथील कांदा उत्पादक शेतकरी केदारनाथ नवले यांच्या कांद्याला १५३१ भाव मिळाला होता. परंतु कांदा व्यापारी सुरेश लाल रतनलाल जैन यांच्या कडून नजरचुकीने ३५३१ भावाने पैसे दिले गेले. पण, नवले यांनी जास्तीचे आलेले २० हजार रुपये जैन यांना परत केेले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कैातुक होत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी हेमंत राका यांच्या हस्ते नवले यांचा सत्कार केला. या प्रसंगी बाजार समितीचे सुपरवायझर दत्तात्रय होळकर, सुनील डचके, व्यापारी प्रविन कदम उपस्थित होते. केदारनाथ नवले हे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष आहेत.