लासलगांव – केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद करत घोषणाबाजी करत निर्यात बंदीचा निषेध नोंदवला. कांदा निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे दर दिवसागणिक खाली येत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता आगामी काळात कांद्याची आवक वाढल्यास बाजार भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे. सरकारने ज्याप्रमाणे जीएसटी नोटबंदीचा निर्णय तातडीने घेतला तसा निर्णय कांद्याची निर्यातबंदी उठून तत्परता दाखवावी असं शेतकऱ्यांच्या वतीने बोलतांना सचिन होळकर तसेच इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले.या आंदोलनात सचिन होळकर, बबन शिंदे, धर्मेश जाधव, ज्ञानेश्वर पाटील, संदीप उगले, महेंद्र हांडगे, सुरेश कुमावत, राजेंद्र जाधव, राजेंद्र कराड, राजेंद्र होळकर, प्रमोद पाटील, तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते.
आंदोलनानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाले.