लासलगांव – लासलगांव वाङ्मय मंडळाच्या वतीने ‘हर्षल बेदमुथा’ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी सकाळी १० वा. सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून संपन्न झाला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिध्द कवी प्रकाश होळकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महंत श्री श्री १०८ स्वामी जनेश्वरानंदगिरीजी महाराज, बोकडदरे, महंत श्री श्री १०८ स्वामी वासुदेवनंदगिरीजी (बहुरुपी) महाराज, लासलगाव तर व्यासपीठीवर लासलगाव प्रेसक्लबचे अध्यक्ष राकेश बोरा, नामकोचे संचालक प्रकाश दायमा, पुस्तकाचे लेखक शिवाजी विसपुते व समीर देवढेसर उपस्थितीत होते.