लासलगांव – लासलगांव शहरामध्ये निमा आयुर्वेदिक रोगप्रतिकारक (इम्युनिटी) क्लिनिकचे उदघाटन सोमवारी करण्यात आले. राज्यात असे ४०० क्लिनिक सुरु होणार असून लासलगांवमध्ये प्रथमच डॉ सुरेश दरेकर व डॉ अनिल ठाकरे यांचे क्लिनिक सुरु झाले.
या क्लिनिकचे उदघाटन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ राजाराम शैन्द्रें व डॉ आहिरे ,व लासलगांव डॉक्टर्स असोसियशनचे अध्यक्ष डॉ सुजित गुंजाऴ यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र निमा संघटनेने इम्युनिटी ही संकल्पना समोर आणली. त्यानंतर केेद्र सरकारचा आयुष विभाग ,महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभाग, आयुष टास्क फोर्स यांनी यास मान्यता दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या क्लिनिकमध्ये प्रतिकारशक्ती किती आहे, ती तपासली जाणार आहे. त्यानुसार त्या व्यक्तीला आहार व औषधाबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. या क्लिनिकच्या उदघाटन प्रसंगी डॉ कैलास पाटील, डॉ भाऊसाहेब रायते, डॉ अशोक महाले, डॉ सुनिल चव्हाण, डॉ उत्तम रायते, डॉ शरद कातकाडे, डॉ किरण निकम, डॉ वसुंधरा दरेकर, डॉ रुपेश गांगुर्ड, शरद फड उपस्थित होते.