लासलगांव – अखेर निफाड पंचायत समिती सभापती व उपसभापती यांनी घेतली लासलगावच्या समस्यांची गंभीर दखल…
घेतली. गुरुवारी पंचायत समिती निफाडच्या सभापती सौ.रत्ना ताई संगमनेरे व उपसभापती संजय शेवाळे यांनी
लासलगाव शहर विकास समितीच्या सदस्यां समवेत शहरातील आदिवासी हौंसिंग सोसायटी, पिंजार गल्ली, निमगाव रोड, सर्वे नं.९३, संजय नगर येथील सार्वजनीक नादुरूस्त शौचालय, तुंबलेल्या गटारी, ठिकठिकाणी कुजलेला कचरा, यांची सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच परिसरातील नागरीकांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी महिलांनी पिण्याचे अशुध्द पाणी पुरवठा, पाण्याची अनिश्चित वेळ या समस्यांचा पाढा वाचला. महिलांच्या समस्या ऐकुन सभापती व उपसभापती त्यांनी प्रशासक सुधाकर सोनवणे व ग्रामसेवक शरद पाटील यांना तात्काळ समस्या सोडवण्याचे आदेश दिले. याप्रसंगी सचिन होळकर , प्रकाश पाटील, प्रविण कदम, विकास कोल्हे,बबनराव शिंदे धर्मेश जाधव, किशोर व्यास ,राजेंद्र कराड अनिल अबड,राजेंद्र जाधव, संदिप उगले, महेश बकरे,दिनेश जोशी,मयुर झांबरे, सोनू मोरे, संकेत वाळेकर, संतोष पवार, रोहित पाटील, देवेंद्र भावसार, मुन्ना शेख, अन्वर शेख, नागरीक उपस्थित होते.