येवला – दाखल झालेल्या तक्रारीवर कुठलीही कार्यवाही करु नये यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येवला पोलिस स्टेशनमधील पोलिस शिपाई अतुल सुधाकर फलके याच्याविरुद्ध अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. फलके याने दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. या पथकाच्या समोर फलके याने पोलिसांची मागणी पुन्हा केली. त्याची दखल घेत एसीबीने फलके याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एसीबीचे पथक पुढील तपास करीत आहे.
दरम्यान, कुणीही लाच मागत असल्यास किंवा देत असल्यास यासंबंधीची तक्रार १०६४ या क्रमांकावर करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.