मुंबई – लाच देणे आणि घेणे हे दोन्ही अपराध आहेत. मात्र भारतासमवेत जगातील अनेक देशांमध्ये हा भ्रष्ट्राचारच शिष्ठाचार म्हणून पाळला जातो. नुकतीच लाच घेतानाची एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिंपरी येथील या व्हिडिओ असून यात एक महिला पोलिस थेट खिशात लाच स्वीकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्या भागात जवळच इतर वाहतूक पोलिसही हजर होते. मात्र त्यांची नजर चुकून या महिला वाहतूक पोलिसांनी गुपचूप लाच स्वीकारली.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, एका दुचाकीवरील दोन महिलांना पोलिसांनी अडविले, त्यापैकी एका महिलेने तेथील महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या जवळ जाते. त्यानंतर पोलिस महिला त्या तरुणीला काहीतरी सांगते आणि त्यानंतर तरुणी पोलिस महिलेच्या मागच्या खिशात पैसे ठेवते. यानंतर महिला वाहतूक पोलीस तरुणीला इशारा करून जायला सांगते. हा व्हीडीओ सोशल मिडिया वर व्हायरल झाल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणावर शेअर करून खिल्ली उडवताना दिसत आहेत.
वाहतूकीच्या नियमांचे पालन होते की नाही, याची पाहाणी करण्यासाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे प्रवाशांसह वाहतूक पोलिसांवर नजर ठेवतात. तरी देखील अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. यातून आपले कर्तव्य बजावताना स्वयंशिस्त आणि जबाबदारीची जाणीव या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे समोर आले आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/mat_jane_de_yar/status/1339741529200443392