न्यूयॉर्क – लाईव्ह कार्यक्रमात रिपोर्टर किंवा अँकरच्या डोळ्यात पाणी येण्याचे प्रसंग क्वचितच येतात. मात्र सध्या कोरोनाने तेही दिवस दाखविले आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे जगभरात अमेरिकेला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे लोकांचा भानविक संयमही ढळत चालला आहे. अलीकडेच सीएनएनची एक रिपोर्टर सारा सीडनर लॉस एंजेलिसवरून रिपोर्टींग करताना थेट प्रक्षेपणादरम्यान रडली. या घटनेची जगभरात चांगलीच चर्चा झाली.
या प्रसंगाचा व्हिडीओ जगभरात व्हायरल होऊ लागला आहे. आपल्या आई-वडिलांना गमावणाऱ्या एका महिलेची व्यथा ही रिपोर्टर मांडत होती. मुळात ती आपल्याच आई-वडिलांच्या जाण्याचे दुःख मांडत होती. विशेष म्हणजे अंत्यसंस्कारासाठी कुठेही जागा न मिळाल्याने पार्किंगमध्येच ती दोघांवरही अंत्यसंस्कार करीत होती. रिपोर्टिंग करतानाच तिचा बांध फुटला.
सिडनर म्हणते, की मला रागात रडायला आले. ज्यांनी कोरोनाला गांभिर्याने घेतले नाही, त्यांच्याविषयी माझ्य मनात राग आहे. ते सत्याविरुद्ध लढत राहिले आणि इतरांचा जीव धोक्यात घालत राहिले. सिडनरने यादरम्यान सांगितले की हा विषाणू रंगाच्या आड विविध समुदायांना घृणेतून मृत्यूच्या दारात नेऊन सोडत आहे. यातील अनेक लोक असे आहेत ज्यांच्यावर आमचे दैनंदिन जगणे अवलंबून आहे, असेही ती म्हणाली. आईला घेऊन जवळपास दहा रुग्णालये घेऊन फिरली, हे सांगताना तिचा बांध फुटला. त्यानंतर तिने सीएनएनच्या अँकरची माफीही मागितली. मात्र अँकरने तिचे सांत्वन करीत माफी मागण्याची गरज नसल्याचे सांगितले.
WOW. Powerful moment on @CNN just now. Must watch. Sending you lots of love @sarasidnerCNN pic.twitter.com/v8Pv4xOo36
— Faith Abubéy (@ReporterFaith) January 12, 2021