पुणे – सिरम इन्स्टिट्यूटमधील कोविशिल्ड ही कोरोना लस वितरणासाठी निघाल्यानंतर कंपनीचे सीईओ अदर पुनावाला भावूक झाल्याचे पहायला मिळाले. त्यांनी स्वतःच लस रवाना झाल्याप्रसंगाचे फोटो शेअर केले.
वंदे भारत अभियानाप्रमाणेच लस वाहतुकीसाठी नागरी हवाई सेवा मंत्रालय एका नवीन अभियानाची सुरूवात करत असल्याचं, नागरी हवाई सेवा मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.
पुण्याहून दिल्ली आणि चेन्नईला लस घेऊन जाणाऱ्या विमानांपासून या अभियानाची सुरवात झाली. तत्पूर्वी, सिरम कंपनीतून लशींचे डोस असलेले ६ ट्रक आज सकाळी कडक बंदोबस्तात पुणे विमानतळाकडे रवाना झाले.
एअर इंडिया, स्पाइस जेट, गो एअर आणि इंडिगो कंपन्यांच्या विमानांमधून ५६ लाख ५० हजार लसीच्या मात्रा दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलॉंग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पटना, बेंगळूरू, लखनौ आणि चंडीगढ येथे पाठवल्या जात आहेत.
पुनावाला यांचे ट्विट
https://twitter.com/adarpoonawalla/status/1348955050446503940