भोपाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गांधी मेडिकल कॉलेजच्या पोस्टमार्टम अहवालात स्वयंसेवी मृत्यूचे संभाव्य कारण विषामुळे किंवा हृदयविकारच्या धक्क्याने झाला असून, त्याची चौकशी चालू आहे, असे भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, भोपाळ येथील एका खासगी रुग्णालयात चाचणी दरम्यान ४२ वर्षीय स्वयंसेवकास कोव्हाक्सिन देण्यात आले. मात्र १० दिवसांनंतर २१ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
भारत बायोटेक स्पष्टपणे म्हणाले की, चाचणी दरम्यान दिलेल्या लसीशी दीपकच्या मृत्यूचा काही संबंध नाही. भोपाळच्या टीला जमालपुरा येथील रहिवासी दीपकच्या नातेवाईकांनी मृत्यूच्यामागील कारण लस दिली होती, असे म्हटले असून भोपाळच्या खासगी रुग्णालयात त्याला लस देण्यात आली होती. तर कंपनीने म्हटले आहे की, स्वयंसेवक चाचणीत भाग घेण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता करीत असून तो त्यावेळी पूर्णपणे स्वस्थ होता. तसेच लस देण्यापूर्वी त्यांना सर्व नियम व अटींची माहिती देण्यात आली. ही लस दिल्यानंतर सतत सात दिवस त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवले गेले, त्या दरम्यान त्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम दिसला नाही.