जमशेदपूर (झारखंड) – कोविड प्रतिबंधाच्या दोन लसींचा डोस घेतलेले एक डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाच्या दोन सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. डॉक्टरांनी पहिला डोस १९ जानेवारी आणि दुसरा डोस २० फेब्रुवारीला घेतला होता. कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही कोरोनाचा संसर्ग होण्याचं हे झारखंडमधील पहिले प्रकरण आहे.
साकची भागातील त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर म्हणाले, की लस घेतल्यामुळेच संसर्गची तीव्रता कमी आहे. लस घेतल्याच्या ४५ दिवसांनंतर अँटीबॉडी पूर्णपणे विकसित होतात. लस घेऊन त्यांना ४५ दिवस झाले नाहीत, त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे बाधा झाली असेल, असंही डॉक्टर म्हणाले.
कोरोनापासून पूर्ण बचावासाठी दोन लसींचा डोस घेतल्यानंतर कमीत कमी दोन महिने पूर्ण झालेले असावेत. लस घेतल्यामुळेच संसर्ग खूपच कमी झाला आहे आणि त्यांच्या पत्नींनी लस न घेतल्याने त्यांच्यात संसर्गाची तीव्रता अधिक आहे.
देशात कोरोना लसीकरण अभियान वेगानं सुरू आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत १९,११,९१३ लोकांनी लस घेतली आहे. एकूण लस घेतलेल्यांची संख्या ३.४८ कोटीवर पोहोचलेली आहे.