नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाला पुढील आठवड्यात प्रारंभ होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जिल्ह्यात आता ड्रायरन घेतला जाणार आहे. यापूर्वी देशातील काही जिल्ह्यांमध्ये पहिला ड्रायरन घेण्यात आला. तो यशस्वी ठरला. आता दुसरा ड्रायरन येत्या ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. लसीकरणात अचूकता साधणे, विविध विभागांचे समन्वय चोख होणे आदींची खात्री या ड्रायरनमध्ये केली जाणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1346803252730335233