मुंबई – कोरोनाविरोधातील लसीकरण डिजीटल हेल्थच्या दिशेने मोठे पाऊल ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लसीकरणासाठी कोव्हीन पोर्टलवर नोंद होत असलेल्या आकड्यांचा वापर भविष्यात लाभार्थ्यांपर्यंत इतर सेवा पोहोचविण्यासाठी होऊ शकतो. हा प्लॅटफॉर्म दररोज कोट्यवधी लसीकरणाचे आकडे सांभाळून ठेवण्यास सक्षम आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडे डिजीटल हेल्ख मिशनची जबाबदारी आहे.
डिजीटल हेल्थ आयडीचे लाभ
प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. शर्मा यांनी सांगितले की लसीकरणादरम्यान नोंदणीनंतर प्रत्येक लाभार्थ्याचा डिजीटल हेल्थ आयडी तयार केला जात आहे. या आयडीचा वापर लाभार्थ्यांना पुढे आरोग्यसेवा पुरविण्यासाठी वापरला केला जाऊ शकतो. आरोग्य तपासणी आणि उपचाराशी संबंधित संपूर्ण जेटा या प्लॅटफॉर्मवर असेल.









