निलेश गौतम (डांगसौंदाणे, ता. बागलाण)
मुळचा कळवण येथील असलेला मात्र बालपणापासून नाशिक मध्ये शिक्षण घेतलेल्या प्रतीक कोठावदे ने इंडियन नेव्ही आणि आर्मीच्या यु. पी. एस.सी.च्या झालेल्या स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक असे यश संपादीत करीत देशात प्रथम आला आहे. प्रतीक च्या या यशाबद्दल सर्वच स्थरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
नाशिकच्या सातपूर येथील औद्यीगिक प्रशिक्षण केंद्रात सुपरवायझर असलेले प्रदीप कोठावदे यांचा सुपुत्र असलेल्याला प्रतिकचे माध्यमिक शिक्षण नाशिकच्या रचना विद्यालायत झाले असून उच्य माध्यमिक शिक्षण नाशिकच्या आर. वाय. के. विद्यालयातून झाले आहे. १२ वी सायन्स मध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवाजीनगर मधून बी टेकचे शिक्षण घेणाऱ्या प्रतिकला शेवटच्या अंतिम वर्ष्यात ८ व्या सेमिस्टर मध्ये कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन काळात घरी नाशिक ला येण्याची संधी मिळाली. याच काळात प्रतिकने आर्मी आणि नेव्ही च्या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. यासाठी कुठलाही क्लास न लावता वडील प्रदीप कोठावदे आणि महापालिकेत शिक्षिका असलेल्या आई जयश्री कोठावदे यांचे कडून घरीच मार्गदर्शन घेतले.
प्रतीकने हा अभ्यास सुरू केला. ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये भोपाळ व बंगळुरू येथे झालेल्या या परीक्षेत देशभरातून पहिल्या प्रिलीयम मध्ये सुमारे ७ लाख विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. यापैकी अंतिम परीक्षेसाठी इंडियन आर्मी साठी ३ हजार तर इंडियन नेव्ही साठी २ हजार १०० विद्यार्थी पात्र ठरले होते.
या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात प्रतीकने देशभरातून दोघे ही परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याने प्रतीकची दोघे ठिकाणी लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. प्रतीकच्या एकाच वेळेस दोघे ठिकाणी झालेल्या निवडीमुळे त्याचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. याबाबत प्रतिकच्या वडिलांशी संपर्क साधला असता प्रतीकला लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड असल्याने प्रतिकने आज त्याचे व आमचे स्वप्न पूर्ण केल्याची प्रतिक्रिया प्रदीप कोठावदे यांनी दिली. तर दोन्ही ठिकाणी एकाच वेळीस लेफ्टनंट पदाला गवसणी घालणारा प्रतीक इंडियन नेव्ही मध्येच जाणार आहे. प्रशिक्षणासाठी केरळ मधील इझीमला येथे प्रतीक लवकरच जाणार असल्याचेही कोठावदे यांनी सांगितले आहे.