नवी दिल्ली – लक्झमबर्ग येथील बी. मेडिकल सिस्टम्स ही कंपनी मार्चपर्यंत भारतात कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देणार आहे. कोरोना विषाणूच्या लसीसाठी ही यंत्रणा स्थापित केली जाणार आहे.
या कंपनीचे सीईओ एल. प्रोव्हॉस्ट यांनी सांगितले की, मार्चपर्यंत कंपनी ही सुविधा निर्माण करणार आहे. सदर तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी येथे पथक पाठविले जाणार आहे. तसेच गुजरात येथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी योग्य जागा शोधण्यात येईल.
यावेळी, बी मेडिकल सिस्टमचे डेप्युटी सीईओ जे. दोशी म्हणाले की, आम्ही भारतात लस तयार करु, परंतु त्यापूर्वी मार्च २०२१ पर्यंत मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे. तसेच गुजरात सह तेलंगणा आणि महाराष्ट्र ही राज्ये आपल्या संपर्कात आहेत.
दरम्यान, मागील महिन्यात झालेल्या पहिल्या द्विपक्षीय शिखर परिषदेच्या वेळी लक्झमबर्गचे पंतप्रधान बेटेल यांनी पंतप्रधान मोदींसमोर यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता, भारतातील लसींच्या शेवटच्या टप्प्यात वितरणाची समस्या सोडविण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी त्वरित या संधीचा फायदा उठविला, त्यानंतर गुजरात सरकाराला सूचना देऊन लक्झेंबर्गमधील कंपनीशी संपर्क स्थापित करणार्याचे प्रस्ताव तयार केले.