पुणे – जगप्रसिद्ध लवासा प्रकल्प दिवाळखोरीत गेला असून या प्रकल्पाच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांना बोली लावण्याची संधी आहे. त्याची अंतिम मुदत आज (२० नोव्हेंबर) आहे. या प्रकल्पासाठी किती बोली लागते आणि कोण खरेदी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लवासा प्रकल्प आर्थिक दिवाळखोरीत गेल्याने २०१८ मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने एक आदेश दिले. त्यानुसार या प्रकल्पाची जबाबारी रिझोल्यूशन प्रोफेशनलकडे सोपविण्यात आली. त्यानंतर लवासातील मालमत्तांची विक्री करणे आणि गुंतवणूकदारांची देणी देण्यासाठी प्रोफेशनल कार्यवाही करीत आहे. यापूर्वी दिलेल्या निमंत्रणाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता कोणते गुंतवणूकदार पुढे येतात याबाबत औत्सुक्य आहे.