पंढरपूर – कार्तिक एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, सौ. सुनेत्रा पवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी कवडुजी भोयर, सौ. कुसुम भोयर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ. सारिका भरणे उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयर यांना एसटी प्रवास सवलत पास सुपुर्द करत त्यांचा सत्कार केला. यावेळी पवार यांनी कोरोनाचे संकट दूर होऊ दे, आणि लवकरच लस येऊ दे, कोरोना पासून मुक्ती मिळू दे असं साकडं विठुरायाला घातले.