लासलगाव – दारु पिऊन तो थेट न्यायाधीशांच्या निवासस्थानी लपला आणि आता थेट कारागृहात पोहचला आहे. ही घटना निफाड येथे घडली आहे. न्यायालयाने संशयिताला दोन दिवासांची पोलिस आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
निफाड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एस. कोचर यांच्या न्यायालयातील शासकीय निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी रात्री अनाधिकृतपणे दारु पिऊन एका व्यक्तीने प्रवेश केला आणि तो लपून बसला. या संशयिताचे नाव दिपक विश्वनाथ जाधव (वय ३९, रा. गोरेवाडी, जेलरोड, नाशिक) असे आहे. त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी निफाड पोलिस मुख्यालयाचे पोलिस शिपाई राजेंद्र शिवाजी मिस्त्री यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, लासलगाव येथील निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम.एस.कोचर यांच्या निवासाची व्यवस्था आहे. या निवासस्थानी २६ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मी प्रवेशद्वारावर ड्युटीवर असतांना शिपाई बाबासाहेब चव्हाण यांनी फोन करून न्यायाधीश श्रीमती कोचर यांचे बंगल्याचे आवारात एक अज्ञात इसम लपुन बसलेला आहे. असे सांगताच पोलिस शिपाई राजेंद्र शिवाजी मिस्तरी,निफाड पोलिस कार्यालयाचे एएसआय थेटे, देशमुख राठोड या कर्मचारी यांनी या इसमास पकडले असता त्याचा उग्र वास येत होता. दिपक यास अटक करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक आर.बी..सानप यांचे मार्गदर्शनाखाली निफाड पोलिस तपास करीत आहेत.