बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लडाखमध्ये भारतीय लष्कराकडून पर्यावरणाचे असे रक्षण…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 24, 2020 | 6:39 am
in संमिश्र वार्ता
0
Dz53CP3W0AAj9lB

नवी दिल्ली – लेह, लडाख आणि सियाचीन ग्लेशियरच्या उणे ४० अंश सेल्सिअस तपमानात देशाचे रक्षण करण्यात गुंतलेते भारतीय सैन्य पर्यावरणाचेही रक्षण करीत असल्याची बाब समोर येत आहे. सियाचीन ग्लेशियरला प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी सैन्याने आपल्या शिधा व इतर खाद्यपदार्थांसाठी प्लास्टिक पिशव्या आणि टेट्रा पॅक वापरण्यास बंदी घातली आहे. प्लास्टिक पिशव्या व टेट्रा पॅकऐवजी रेशन व इतर वस्तू पॅक करण्यासाठी सैन्याने पुन्हा वापरता येतील अशा पिशव्यांना प्राधान्य दिले आहे.
संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अहवाल सादर करताना ही माहिती दिली आहे. एनजीटीचे मुख्य न्यायाधीश ए. के. गोयल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ग्लेशियर आणि लष्करी छावण्या, वसाहतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि सैन्य कचरा व्यवस्थापन संदर्भात मंत्रालयाकडे सविस्तर अहवाल मागितला होता. एअरचीफ मार्शल अनिल यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. न्यायाधिकरणास सादर केलेल्या अहवालात संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, सैन्याने सियाचीन व इतरत्र प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी जूटच्या पिशव्या वापरण्यास सुरूवात केली आहे.

तसेच  ट्रेटा पॅक आणि रिफिल असलेल्या छोट्या पॅकचा वापरही कमी झाला आहे. सैन्याने मेटल बॅरल्स आणि जर्सन वापरणे बंद केले आहे. त्याऐवजी एचडीपीई म्हणजेच उच्च घनतेचे पॉलीथिलीन बॅरल्स आणि जर्सन वापरण्यास सुरवात केली आहे. त्याचप्रमाणे  घनकचरा व्यवस्थापनासाठी लष्कराने एक टास्क फोर्सदेखील तयार केल्याचे अहवालात म्हटले आहे.


सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी
संरक्षण मंत्रालयाने असे म्हटले आहे की, मानवी विष्ठा आणि मूत्र उणे ४० अंश तापमानात जमा करणे आणि योग्य विल्हेवाट लावणे हे एक मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणीय हितास अनुकूल असलेल्या मानवी विष्ठेच्या योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासह बायो-डायजेस्टरचा उपयोग पायलट प्रकल्प म्हणून केला जात आहे. हे तंत्रज्ञान ६० ठिकाणी बसविण्यात आले आहे. संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) ग्वालियर यांनी बायो-डायजेस्टरचा शोध लावला आहे.

कचरा आणण्यासाठी
संरक्षण मंत्रालयाने एनजीटीला सांगितले आहे की, कचरा स्वतंत्र करण्याचे काम सेनेचे जवान करत आहेत. तसेच, हेलिकॉप्टरचा वापर आता ग्लेशियरमधून कचरा खाली आणण्यासाठी व योग्य विल्हेवाट लावण्यासाठी केला जाणार आहे. ग्लेशियरमधील चौकीवर सैन्याला रेशन व इतर वस्तू दिल्यानंतर परत जात असताना घनकचरा रिक्त हेलिकॉप्टरमध्ये पाठविला जाणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फास्टॅगचा अत्यंत कटू अनुभव

Next Post

कैदी शिकताय चक्क परदेशी भाषा!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

कैदी शिकताय चक्क परदेशी भाषा!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011