नवी दिल्ली ः आपल्याच दोन्ही मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अशोक विहार पोलिसांनी एका व्यक्तिला अटक केली आहे. संशयित वडील गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या १५ आणि १६ वर्षांच्या मुलींवर अत्याचार करत होता. संशयिताच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
वजिरपूर येथील औद्योगिक परिसरात पीडित मुली कुटुंबासोबत राहात होत्या. संशयित बाप एका कंपनीत काम करतो. १५ आणि १६ वर्षीय मुलींवर सहा महिन्यांपासून बाप अत्याचार करत होता. या घटनेची माहिती त्यांच्या आईला दिली. त्यानंतर संशयित बापाने सगळ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. संशयिताने धमकावल्यानंतर कोणीही पोलिसांत तक्रार दिली नाही. परंतु बुधवारी संशयिताने मुलीवर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. संशयिताच्या पत्नीने संपूर्ण माहिती दिल्यानंतर महिला पोलिसांनी दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलींचे समुपदेशन केले जात आहे.