सर्पदंशाने दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिक – लघुशंकेसाठी थांबलेल्या दुचाकीस्वारास विषारी सापाने चावा घेतल्याची घटना चोपडा लॉन्स परिसरात घडली. या घटनेत दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वी मृत्यु झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
भाऊसाहेब रामचंद्र वानले (४८ रा.अजमेर सौंदाणे ता.सटाणा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. वानले गुरूवारी (दि.२४) सातपूर येथून चोपडा लॉन्स मार्गे रामवाडीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. चोपडा लॉन्स भागातील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर दुचाकी थांबवून ते रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी गेले असता विषारी सापाने त्यांना चावा घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांचे मावस भाऊ रामदास हिरे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक देवरे करीत आहेत.
—
भिकाऱ्यामंध्ये मारहाण
नाशिक – परिसरात भीक मागण्याच्या कारणातून दोघांनी एका महिलेस बेदम मारहाण केल्याची घटना दत्तमंदिर सिग्नल भागात घडली. या घटनेत महिलेस दगड फेकून मारल्याने ती जखमी झाली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश उर्फ हरिश्चंद्र जाधव व चाचा (पूर्ण नाव गाव नाही) अशी महिलेस मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वनिता वाघ या महिलेने तक्रार दाखल केली आहे. संशयीतांसह तक्रारदार महिला दत्तमंदिर सिग्नल भागात भीक मागून आपला उदनिर्वाह करतात. गुरूवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास महिला सिग्नल जवळील भिंती लगत असलेल्या झाडाखाली झोपलेली असतांना दोघांनी तिला गाठले. यावेळी त्यांनी तू येथे भिक मागायची नाही व येथे झोपायचेही नाही या कारणातून वाद घातला. यावेळी महिलेने दोघांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संशयीतांनी तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी एकाने दगड फेकून मारल्याने महिलेच्या तोंडास दुखापत झाली असून अधिक तपास जमादार परदेशी करीत आहेत.
रिक्षातून बॅटरी चोरी
नाशिक – पार्क केलेल्या अॅटोरिक्षाची बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सुयोग हॉस्पिटल भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कय्युम मोहम्मद शफी अक्तार (रा.मुलतानपुरा जुने नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कय्युम अक्तार हे गुरूवारी (दि.२४) रात्री सुयोग हॉस्पिटल भागात गेले होते. अझर स्कॅप सेंटर समोर त्यांनी आपली अॅटोरिक्षा (एमएच १५ एजी ३२३०) पार्क केली असता चोरट्यांनी सुमारे ७ हजार रूपये किमतीची रिक्षाची बॅटरी चोरून नेली. अधिक तपास पोलीस नाईक काकड करीत आहेत.
शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून चोरटे पार्क केलेल्या दुचाकी पळवून नेत आहे. नुकत्याच वेगवेगळ््या ठिकाणाहून तीन मोटारसायकली चोरीस गेल्या. याप्रकरणी भद्रकाली,गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खैरे गल्लीत राहणारे विजय प्रकाश बडे (रा.दिक्षीत चाळ,मोदकेश्वर मंदिर) यांची मोटारसायकल एमएच १५ एफबी ७६२२ गेल्या गुरूवारी (दि.१०) रात्री त्यांच्या घराच्या वाड्याबाहेर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गाढवे करीत आहेत. दुसरी घटना आनंदवली येथे घडली. जाधव मळ््यात राहणाºया तेजश्री जाधव या गेल्या मंगळवारी (दि.२२) मटण घेण्यासाठी परिसरातील रॉयल मटण शॉप या दुकानात गेल्या होत्या. दुकानासमोर त्यांनी अॅक्टीव्हा (एमएच १५ डीजे २४५६) चावीसह उभी केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाणे करीत आहेत. तर खुटवडनगर येथील आकाश दिलीप कुवर यांची स्प्लेंडर गुरूवारी (दि.२४) औद्योगीक वसाहतीतील प्रिसाईज इंजनिअरींग या कारखान्याच्या आवारात लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.