मुंबई – टेलिव्हिजनवरील कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा याने अलीकडेच आपण लग्नाच्या मंडवातून पळून गेलो होतो, असा गौप्यस्फोट शोमध्ये केला. अलीकडेच जया प्रदा आणि राज बब्बर या शोमध्ये आले होते. त्यावेळी गप्पांदरम्यान कपिलने हे रहस्य सांगितले.
मुळात कपिलने राज बब्बर यांना प्रश्न विचारला की, ‘तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे तेव्हा व्यक्तिगतरित्या स्टेजचा आढावा घ्यायचे का?’ त्यावर राज बब्बर यांनी सांगितले की, ‘मी राजकारणात आलो तेव्हा रॅलीमध्ये अनेक फॅन्स यायचे. काहींना रोखणे शक्य होते. मात्र काही फॅन्स उड्या मारून स्टेजवर यायचे. अशावेळी गर्दी खूप जास्त व्हायची. स्टेज एकावेळी इतके जास्त वजन सांभाळू शकत नव्हते आणि तुटून जायचे. याच भितीने मी व्यक्तिगतरिच्या स्टेज मजबुत आहे की नाही, याची खात्री करून घ्यायचो.’
राज बब्बर यांचा अनुभव एकल्यानंतर कपिल शर्मानेही आपल्या लग्नाशी संबंधित एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, ‘तुमचा अनुभव मी आपल्या लग्नाशी रिलेट करू शकतो. असे माझ्या स्वतःच्याच लग्नात झालेले आहे. लग्नाच्या वेळी खूप साऱ्या लोकांनी स्टेजवर गर्दी केली होती. त्यामुळे मी पळत आपल्या रूममध्ये गेलो आणि मग बाहेरच निघालो नाही.’ कपिलचा हा किस्सा एकून जोरदार हशा पिकला.