अलाहबाद – अलाहाबाद विद्यापीठातील एका सहायक प्रोफेसरची जुनी प्रेयसी १५ वर्षांनंतर अचानक विद्यापीठात पोहोचली आणि तिने चांगलाच गोंधळ घातला. या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
प्रेयसीचा असा आरोप होता की, प्रोफेसरने तिच्यासोबत लग्न केले आणि नंतर तिला सोडून दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. तर प्रोफेसरचे म्हणणे आहे की १५ वर्षांपूर्वी दडपणात येऊन त्याने तिच्यासोबत लग्न केले होते, मात्र तो पूर्वीपासून विवाहित होता. तो विवाह अवैध होता, असे त्याचे म्हणणे आहे. त्यानंतर प्रोफेसरने न्यायालयात धाव घेतली. तिथे त्याचे हे लग्न अवैध ठरविण्यात आले.
संबंधित महिला बिहार येथील कटिहार जिल्ह्याची रहिवासी आहे. २००० मध्ये जेएनयूमधून बीए करताना प्रोफेसरही तिथे विद्यार्थी होते. दोघांमध्ये प्रेम झाले आणि एकमेकांच्या जवळ आहे. काही दिवसांनी ती गर्भवती झाली. गुरुवारी ही महिला सहायक प्रोफेसरला भेटण्यासाठी संबंधित विभागात पोहोचली मात्र त्यावेळी प्रोफेसर शहराच्या बाहेर गेले आहेत, असे तिला सांगण्यात आले.
या महिलेने विद्यापीठाच्या परिसरात व वसतीगृहाच्या जवळ गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रोफेसरने आपल्यासोबत लग्न केले आणि आम्हाला एक मुलगाही आहे, असे सांगतानाच तिने प्रोफेसरवर विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपही केला आहे.
प्रोफेसरने तर २००० मध्ये जेव्हा या महिलेशी पुन्हा भेट झाली तेल्हा ती विवाहित होती, असे सांगितले आहे. तिचे लग्न बिहारच्या हाजीपूर जिल्ह्यात झाले. त्यावेळी ही महिला जेएनयूमध्ये रशियन भाषेत बीए करीत होती.
पतीपासून त्रास असल्याचे त्यावेळी तिने आपल्याला सांगितले होते, असा दावा प्रोफेसरने केला आहे. एवढेच नाही तर तिने लग्नासाठी माझ्यावर दबाव आणला, पण ती पूर्वीपासून विवाहित असल्यामुळे मी लग्न केले नाही, असे प्रोफेसरचे म्हणणे आहे. त्यानंतर महिलेने ब्लॅकमेल केले म्हणून एका विहारात लग्न उरकल्याचे त्याने सांगितले.