मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) – पाच महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेल्या तरुणी विषयी सर्वांनाच अतिशय प्रेम व आदरभाव असतो. येथे घडलेली एक घटना सध्या देशभरात चर्चिली जात आहे. लग्नानंतर पाच महिने ही नववधू आपल्या पतीला स्पर्शही करु देत नव्हती. काही ना काही कारणाने ती पतीला टाळत होती. अखेर पतीला संशय आला आणि त्याने वैद्यकीय चाचणीचा आग्रह धरला. त्यासही तिने विरोध केला. अखेर या चाचणीतून धक्कादायक बाब समोर आली आणि सासरकडच्या मंडळी चिंतेत पडली.
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका तरुणाचा २८ ऑक्टोबर २०२० ला सहारनपूर येथील तरुणीसोबत विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्रीपासून ही तरुणी काही ना काही कारणं करून नवऱ्याला जवळ येऊ देत नव्हती.
बरेच दिवस हा प्रकार चाचल्यामुळे तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, तर ती तृतीयपंथी असल्याचे पुढे आले. तातडीने तिच्या माहेरच्या लोकांना याची माहिती देऊन त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला. त्यानंतर तरुणीने पोलिसांना फोन करून सासरच्या मंडळींनी आपल्याला डांबून ठेवले आहे, अशी तक्रार केली.
पोलिसांनी सर्वांना ठाण्यात बोलावले. तिथे सासरच्या लोकांनी चांगलाच गोंधळ घातला आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल दाखवून या तरुणीला घरात ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर ही तरुणी आपल्या माहेरच्या लोकांसोबत घरी निघून गेली.
खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी
लग्नाच्या वेळी तृतीयपंथी असल्याचे आमच्यापासून लपवले. त्यानंतर पतीवर शस्त्रक्रिया आणि अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिने दबाव आणला. त्यावर घटस्फोट घेण्यास म्हटले तर तिने खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी पतीला दिली.