मुंबई – कोरोनामुळे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून अनेक शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, अस्थापनांमध्ये दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते, त्यानंतर काही प्रमाणात सदर व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले होते. आता १ डिसेंबरपासून रेल्वे, बँक, घरगुती गॅस आदीसह चार क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. त्यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिक व ग्राहकांनी माहिती ठेवणे महत्वाचे ठरणार आहे.
काय आहे हा बदल जाणून घेऊ या,
बँकांमध्ये देण्यात येत असलेल्या आरटीजीएस सुविधेतील नियमात बदल करणार आहे. त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेदेखील ओटीपी आधारित रोख पैसे केव्हाही काढता येणार आहे. घरगुती गॅस सिलींडरच्या (एलपीजी ) किंमतीत देखील बदलणार आहेत. तसेच काही भागांसाठी नवीन रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत.
१ ) नवीन रेल्वे गाड्या सुरू :
कोरोना काळात अनेक मार्गांवर गाड्यांची ये-जा करणे सामान्य राहिलेली नाही. रेल्वेने दि.1 डिसेंबरपासून अनेक भागात गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आजपासून झेलम एक्स्प्रेस आणि पंजाब मेल गाड्या प्रवाश्यांसाठी उपलब्ध असतील. दोन्ही गाड्या सामान्य श्रेणी अंतर्गत सुरू केल्या जात आहेत. अनेक गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
२ ) एलपीजीच्या किंमती बदल :
दि. 1 डिसेंबरपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती देखील बदलणार आहेत. तथापि, किंमती वाढतील अशी अपेक्षा आहे. नवीन किंमत लवकरच लागू होईल. या गॅसची किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केली जाते. दि. 1 नोव्हेंबरपासून एलपीजी वितरणासाठी ओटीपी अनिवार्य करण्यात आले आहे.
३ ) एनईएफटी :
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरसाठी दिवसाचे 24 तास सेवा दिल्यानंतर दि. 1डिसेंबरपासून आरटीजीएस (रियल टाइम ग्रास सेटलमेंट) सुविधा वाढविण्याचा निर्णय बँकांनी देखील घेतला आहे. सध्याच्या नियमांनुसार आरटीजीएसच्या मदतीने दुसरा व चौथा शनिवार वगळता सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत निधी हस्तांतरित केला जाऊ शकतो. मंगळवारपासून ही सुविधा चोवीस तास उपलब्ध असेल.
४ ) बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी बदल :
पंजाब नॅशनल बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, 1 डिसेंबरपासून बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची व्यवस्था बदलत आहे. आता रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) आधारित रोख रक्कम काढण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच नियमानुसार बँकेच्या एटीएममध्ये 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल.