कोलकाता – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका या वेळी खूप रंजक ठरणार आहेत. ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांच्यात नंदीग्राममध्ये लढाई रंगणार असून आणखी एक जागेवर सर्वांचे लक्ष लागून आहे. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील डेबरा विधानसभा जागेसाठीची लढाईही यावेळी नंदीग्राम प्रमाणेच रंजक ठरणार आहे.
कारण दोन माजी आयपीएस अधिकारी एकमेकांसमोर उभे राहून आपली राजकीय शक्ती पणाला लावणार आहेत. टीएमसीने माजी आयपीएस अधिकारी हुमायुन कबीर यांना उमेदवारी दिली असून भाजपानेही भारती घोष यांना डेब्रा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
डेबरा विधानसभेची जागा मिदनापूर लोकसभा मतदारसंघात येते. भाजपने पहिल्या दोन टप्प्यातील ५७ उमेदवार जाहीर केली आहे. घोष यांचा त्यात समवेश असून ते भाजपचे उपाध्यक्षही आहेत. तर दुसरीकडे, डेबरा हे हुमायूं कबीर यांचे मूळ शहर आहे. या दोन माजी आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये डेबरा सीटवर थेट संघर्ष सुरू आहे.
हुमायू कबीर टीएमसीकडून पहील्यांचा नशिब अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर भारती घोष यांनी यापूर्वी घाटाळमधून लोकसभा निवडणूकही लढविली आहे. आता सर्वांची नजर डेबराच्या जागेवर आहे, कारण येथे स्पर्धा दोन माजी आयपीएस अधिकाऱ्यांमधील आहे.
भाजपच्या भारती घोष म्हणतात की, त्यांनी पश्चिम मेदनापूरमध्ये सेवा बजावली आहे. त्या पश्चिम मिदनापूर आणि झारग्रामची पोलिस प्रमुख होत्या. तर डेबरा हे हुमायूं कबीर यांचे मूळ शहर असून त्यांचे पालक अजूनही त्याच मतदारसंघात राहतात. त्यामुळे कबीर यांना हा परिसर चांगलाच ठाऊक आहे.