नवी दिल्ली – कोरोनाची लक्षणे असणारे रुग्ण हे लक्षणे नसलेल्या रुग्णांपेक्षा अधिक प्रमाणात (चौपट) प्रादुर्भाव पसरवतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्ग झालेल्या व लक्षणे जाणवणाऱ्या रूग्णांबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधील संशोधकांनी केलेल्या संपर्क ट्रेसिंग अहवालाच्या सांख्यिकीय विश्लेषणामध्ये यासंबंधी संभाव्य धोक्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात इम्पिरियल कॉलेजचे प्रोफेसर नील फर्ग्युसन म्हणाले की, कोरोनाचे लक्षणे असलेले रूग्ण अन्य रूग्णांपेक्षा चारपट जास्त संक्रमण पसरवू शकतात. त्यामुळे संसर्गाची सुरुवातीची चिन्हे दिसताच त्या व्यक्तीने किंवा रुग्णाने स्वत: ला वेगळे (अलग) केले पाहिजे.
या संशोधकांना असेही आढळले आहे की, कामकाजाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणीपेक्षा घरांमध्ये संक्रमणाचा धोका जास्त असतो. कुटुंबातील एका सदस्यापासून दुसर्याला संसर्गाचा प्रसार होण्यास पाच किंवा त्यापेक्षा जास्त दिवसात कोरोना होण्याची लक्षणे दिसण्यासाठी लागतात. अशा व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबात कोरोना संक्रमित होऊ शकतो. नील फर्ग्युसन पुढे म्हणाले की, लक्षणे नसलेले रूग्ण हे तुलनेने कमी संसर्गजन्य असतात. मात्र पुर्वी लक्षणे नसलेल्या रुग्णांना एक आव्हान मानले जात असे. सदर संशोधन मेटा डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे. तसेच या सर्वेक्षणामध्ये ४५ संपर्क ट्रेसिंग अभ्यासांचा समावेश होता.