बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लंडन, दुबई आणि मुंबईत बंगला, आलिशान कार, महागडे घड्याळ…. एवढी आहे शाहरुख खानची संपत्ती

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 2, 2023 | 1:11 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Shahrukh Khan Family1 e1684486976962

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या विषयी जाणून घेणार आहोत. कोणताही अभिनेता म्हटला की त्याच्या संपत्तीचा विषयही पहिले समोर येतो. त्यामुळे शाहरुखची संपत्ती किती असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचेच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत…

शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. आपल्या अभिनयासह लग्झरी लाइफस्टाइलसाठी तो सध्या ओळखला जातो. शाहरुखजवळ ६६० मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ५ हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. तो बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमानच्या तुलनेत शाहरुखकडे दुप्पट प्रॉपर्टी आहे.

शाहरुखच्या लग्झरी प्रॉपर्टीविषयी सांगायचे म्हणजे, त्याच्याजवळ तीन आलिशान बंगल्यांशिवाय अलिबाग येथे एक शानदार फार्महाऊस आहे. या चारही प्रॉपर्टींची एकुण किंमत ६६० कोटी रुपये आहे. याशिवाय शाहरुख अनेक सोर्समधून पैसा कमावतो. संपत्तीच्या बाबतीतही तो किंग म्हणावा असाच आहे. शाहरुखला त्याच्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी फक्त ५० रुपये मिळाले, आता त्याची एकूण संपत्ती ५ हजार कोटीहून अधिक आहे. बॉलीवूड स्टार्समध्ये शाहरुखच्या लक्झरी लाईफला तोड नाही. मुंबईत २०० कोटींचा बंगला, १४ कोटींची कार, २ कोटींचे घड्याळ, लोखोंचे शूज, लंडन, दुबईमध्ये बंगले आहेत. शाहरुख खान हा बॉलीवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. प्रोडक्शन हाऊस, IPL क्रिकेट टीम अशा विविध माध्यमातून शाहरुख कोट्यावधीची कमाई करत आहे.

मुंबईतील शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याचे नाव पुर्वी व्हिला व्हिएना होते. हा बंगला एका किकू गांधी या पारसी गुजराती व्यक्तीकडून शाहरुखने खरेदी केला होता. शाहरुखने १९९५ मध्ये १५ कोटीत खरेदी केला होता. आता या घराची किंमत २०० कोटींहून अधिक आहे.शाहरुख खानचा मुंबईतील वांद्रे येथे असलेला ‘मन्नत’ हा आलिशान बंगला. हा बंगला एखाद्या राजमहलापेक्षा कमी नाही. त्याच्या चाहत्यांमध्ये हा बंगला खूपच फेमस आहे.

अनेक चाहते मन्नत बाहेर उभं राहून फोटो देखील काढतात. वास्तुविशारद-डिझायनर कैफ फकीह यांच्या सहकार्याने गौरी खानने स्वतः मन्नतचे डिजाईन तयार केले. सी व्ह्यूव असलेला हा बंगला सर्व लक्झरी सोई सुविधांनी सुसज्ज आहेत. शाहरुखच्या मन्नत बंगल्याची तुलना अंबानींच्या घराशी केली जाते. या बंगल्यात अनेक बेडरूम, लिव्हिंग एरिया, जिम, वॉक इन वॉर्डरोब, लायब्ररी आणि पर्सनल हॉल देखील आहे.

शाहरुख खान अनेक बंगल्यांचा मालक आहे. त्याचे लंडनमध्येही एक अतिशय आलिशान बंगला आहे. २००९ मध्ये त्याने हा बंगला खरेदी केला होता. शाहरुख खानने सेंट्रेल लंडनमधील पॉश एरिया असलेल्या पार्क लेन हा बंगला खरेदी केला आहे. त्याच्या या अपार्टमेंटची किंमत २० मिलियन पाँड १९० कोटी आहे.

त्याचबरोबर दुबईतील पाम जुमेराह येथे त्यांचा एक लक्झरी व्हिला देखील आहे. या व्हिलाची किंमत १०० कोटी रुपये आहे. आणि या व्हिलाचं नाव जन्नत आहे. सप्टेंबर २००७ मध्ये दुबईस्थित प्रॉपर्टी डेव्हलपर नखील यांनी हा व्हिला शाहरुखला भेट म्हणून दिला होता. दुमजली घर असून १४ हजार वर्ग फूटांच्या या फ्लॉटमध्ये ८५०० वर्ग फूट हा सिग्नेटर व्हिला उभा आहे. यामध्ये स्विमिंग पूल, प्रायव्हेट बीच आहे. खान फॅमिली येथे सुटी एन्जॉय करायला येत असते.

अलिबाग येथे किंग खानचे हॉलिडे होम आहे. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिबागच्या समुद्रकिनारी हे फार्महाऊस आहे. डिसेंबर २०१७ मध्ये इनमक टॅक्स विभागाने शाहरुखचे फार्महाऊस सील केले होते, त्यावेळी याची किंमत २५० कोटी रुपये काढण्यात आली होती. २० हजार वर्गफुटात असलेल्या या फार्महाऊसमध्ये शाहरुखने आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला होता. यामध्ये स्विमिंग पूल, प्रायव्हेट बीच आणि प्रायव्हेट हॅलिपेडसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

लिमोजिन एखादे ब्रॅण्ड नसून लग्झरी कारचे एक क्लास आहे. ही गाडी स्पेशल ऑर्डर देऊन बनवली जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे, गाडीचे इंटेरिअरसुद्धा आपण आपल्या पसंतीने डिझाइन करुन घेऊ शकतो. शाहरुखने ही कार स्पेशल ऑर्डर देऊन बनवली होती. शाहरुखने लिमोजिनचे नाव ‘रॉयल इस्टेट बाय शाहरुख खान’ असे ठेवले आहे. या कारमध्ये दोन केबिन आहेत. उन्हासाठी कारमध्ये सनडेक आहे.

याशिवाय शाहरुखच्या कलेक्शनमध्ये मर्सडीज-बेंज, बीएमडब्‍ल्‍यू आणि ऑडी या कार आहे. सोबतच बुगाती वेरोन ही आलिशान गाडी त्याच्याजवळ असून त्याची किंमत १४ कोटी रुपये आहे. तसेच ४.१ कोटी रुपयांची रोल्स रॉयस कूप, ४ कोटी रुपयांची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, मर्सिडीज बेंझ एस ६०० गार्ड ही २.८ कोटी रुपयांची आहे. त्याचप्रमाणे ५६ लाख रुपयांची Audi A6 आणि १.३ कोटी रुपयांची BMW 6 सिरीज, BMW 7 सिरीजची किंमत २ कोटी रुपये आहे.

शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन ही एखाद्या आलिशान महालाला तोड देईल अशीच आहे. शाहरुख शूटिंग करत असताना ज्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये राहतो ती व्हॉल्वो BR9 मॉडेल आहे. जी खास शाहरुखसाठी प्रसिद्ध व्हॅन डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी डिझाइन केली आहे. शाहरुख व्यतिरिक्त दिलीपने अनेक बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सच्या व्हॅनिटी व्हॅन्स डिझाईन केल्या आहेत. या व्हॅनिटी व्हॅनचे इंटिरिअर जबरदस्त आहे. या व्हॅनचा फ्लोअर पूर्णपणे काचेचा आहे. ‘आय पॅड’वरून ही व्हॅन चालवता येणार आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पॅन्ट्री विभाग, वॉर्डरोब विभाग, एक विशेष मेकअप चेअर आणि स्वतंत्र क्यूबिकल टॉयलेट आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत ४ कोटी रुपये आहे.

शाहरुखचे उत्पन्न स्त्रोत :

  • शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात बिझी स्टार्सपैकी एक आहे. शाहरुख खानचे कमाई माध्यम एकमेव अभिनय क्षेत्र नाही. तो निर्माता आहे, याशिवाय टीव्ही होस्ट करुनही कमाई करतो.
  • शाहरुख आयपीएल आणि अनेक ब्रॅण्ड एन्डॉर्समेंट्समध्ये बिझी असतो. शाहरुख जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.
  • याशिवाय तो अवॉर्ड फंक्शन होस्ट करणे, लग्न, पार्टी आणि इतर इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्मन्स देऊन कमाई करतो.
  • शाहरुख दोन प्रॉडक्शन कंपन्यांचा मालक आहे. ड्रीम्ज अनलिमिटेड आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत तो चित्रपटांची निर्मिती करतो.
  • शाहरुख अनेक रेस्तराँ चेन्सचा मालक आहे. दिल्लीतील ‘फॅट खान बर्गर’ चेन त्याच्या मालकिची आहे.
  • शाहरुख आयपीएलच्या कोलकाता नाइट राइडर्स टीमचा को-ओनर आहे. याशिवाय त्याने एक फुटबॉल टीम (न्यू डेल्ही एंजेल्स) खरेदी केली आहे.
  • शाहरुख ख्रानचा परफ्यूम ब्रॅण्ड, With Love from Shah rukh आणि Shah rukh Khan Seduction बाजारात लोकप्रिय आहे.

लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख कोट्यवधी रुपये मानधन घेत असतो. काही वर्षांपूर्वी दुबईतील एका लग्नात डान्स परफॉर्मन्ससाठी शाहरुखने ८ कोटी रुपये घेतले होते. तर मुंबईत फक्त अर्ध्या तासासाठी व्हीआयपी प्रेजेंस देण्यासाठी किंग खानला ५ कोटी रुपये दिले गेले होते. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखला दरवर्षी २५० लग्नांचे आमंत्रण मिळत असते. त्यापैकी तो फक्त १० लग्नात सहभागी होत असतो.

Bollywood Actor Shahrukh Khan Property and lifestyle

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशात ऑक्टोबरमध्ये इतक्या कोटीचे झाले जीएसटी संकलन…१३ टक्के झाली वाढ

Next Post

निवृत्तीवेतनधारक १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत देशव्यापी ही मोहीम… हा आहे फायदा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Next Post
old man

निवृत्तीवेतनधारक १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत देशव्यापी ही मोहीम… हा आहे फायदा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011