नवी दिल्ली – आजपासून (१५ जानेवारी) दूरसंचार क्षेत्रात महत्त्वाचा बदल होत आहे. लँडलाईनवरुन मोबाईलवर फोन करताना दहा अंकी मोबाईल नंबरच्या आधी ० (शून्य) लावणे सक्तीचे राहणार आहे. यासंदर्भात केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने सांगितले आहे की, मोबाईल ते मोबाईल किंवा मोबाईल ते लँडलाईन कॉल यात कुठलेही बदल होणार नाहीत.
लँडलाईनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी ० नंबर अनिवार्य करण्याची शिफारस भारतीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राय)ने दूरसंचार मंत्रालयाकडे केली होती. त्यास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे टेलिफोन कंपन्यांना अधिक नंबर तयार करण्याची संधी मिळणार आहे.